Saturday, 13 September 2025

चंद्रपुरात झालेला 13 सप्टेंबर च्या रात्रीचा पाऊस म्हणजे ‘कहरच होता,'

 *चंद्रपुरात झालेला आताचा पाऊस म्हणजे ‘कहरच होता*

मेघगर्जना, विजाचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि धो धो पाऊस….

जेव्हा पासून समज आली तेव्हापासूनचा सर्वात खतरनाक पाऊस पाहण्याचा, अनुभवण्याचा अनुभव…

रात्री यावेळेस सुध्दा झोप विसरुन, अनेक परिवार घरात एके ठिकाणी एकत्र बसून असल्याचा अनुभव प्रथमच घेत आहे…

चिंता वाढविणारे ते २० मिनिटे…

तुमाच्याकडे?

चंद्रपूरमधील रौद्र पाऊस आणि वाढलेली भीती…

१३ सप्टे २०२५, वेळ ११:४० pm 

     चंद्रपूरमध्ये नुकताच झालेला पाऊस म्हणजे नुसता कहरच! मेघगर्जनेचा प्रचंड आवाज, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि धो धो कोसळणारा पाऊस… हा अनुभव मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घेतला. ज्या क्षणापासून मला समज आली, त्या क्षणापासूनचा हा सर्वात खतरनाक आणि थरारक पाऊस होता.

      रात्रीची वेळ होती, एरव्ही शांत होणारा आमचा म्हाडा कॉलनी, दाताळा, परिसर आज निसर्गाच्या या अचानक बदललेल्या रूपामुळे पूर्णपणे जागे झालेला होता. (बहूतेक शहरात सर्वत्र) सगळेजण झोप विसरून आपापल्या घरात एका कोपऱ्यात एकत्र बसले होते. सकाळपासूनच इरई धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू होताच, इकडे पठाणपुरा गेट बाहेर आणी विठोबा खिडकी बाहेर पाण्याच्या पातळीत वाढ असलेला एकखाद दूसरा सांगतच आहे आणि त्यातच अशा ढगफुटीसारख्या पावसाने परिस्थिती आणखीच भयावह बनली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच चिंता होती. ती २० मिनिटे तर अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारी होती.


आम्ही सारे खिडकीतून बाहेर बघत होतो. जेव्हा वीज चमकत होती, तेव्हा सारा परिसर एका क्षणात लख्ख प्रकाशात न्हाऊन निघत होता. त्या क्षणासाठी थोडं कुतूहल जरी वाटले, तरी दुसऱ्याच क्षणाला विजांचा कडकडाट आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी पुन्हा एकदा थरारक वातावरण निर्माण करत होत्या. जणू काही निसर्गाने आपलं रौद्ररूप दाखवलं होतं.


तो अनुभव केवळ पावसाचा नव्हता, तर निसर्गाच्या शक्तीचा आणि त्यासमोर आपण किती लहान आहोत याची जाणीव करून देणारा होता. तो क्षण भीतीदायक असला तरी, एकत्र येण्याची आणि संकटाचा सामना करण्याची एक वेगळीच शिकवण देऊन गेला.

Monday, 26 August 2024

आमदार भरती


*आमदार भरती*

येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात आमदार भरती जाहिरात २०२४ ते २०२९  निघणार आहे..
महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या २८८ जागा त्वरीत भरणे आहेत, 
सुवर्ण संधी-- 
आपली वाट पाहात आहे,
फक्त ५ वर्ष जाॅब करा, आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही, 
कोणत्याही अनुभवाची गरज नाही, 
अशिक्षीत असलात तरी चालेल, 
कोणताही गुन्हा केलेला असेल तरी चालेल, 
कामकाज नाही केले तरी चालेल, 
अनुभवाची गरज नाही, 
कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी  ₹ १,९०,०००/-   पगार, 
राहणे साठी मोफत निवास स्थान मिळेल, 
कॅंटीन मध्ये स्वस्तात जेवण फक्त २०/- रूपये, 
फोन साठी १५०००/- भत्ता, 
विनामूल्य ३ टेलिफोन, 
५०००० युनिट्स मोफत वीज, 
४००० लिटर पाणी फुकट, 
कुटुंबासह ३४ हवाई प्रवास विना मूल्य, 
मोफत पेट्रोल, 
पहिल्या एसी मधील अमर्यादित ट्रेन प्रवास किमान ५ वर्षांसाठी, 
एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेंशन योजना भेटणार हमखास, 
प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी ₹२००० अतिरिक्त पेंशन, 
कपडे धुवायला रोज ६०० रूपये, 
रोजचा भत्ता रू २०००, 
फर्नीचर साठी एक लाख रुपये, 
ऑफिस खर्च ६०,०००/- महीना तसेच 
इतर अनेक फायदे!
*निवड प्रक्रिया सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल,* 
अंतिम यादी तयार होईल,
आमदार व्हा -- आपल्या बरोबरीने आपल्या नातू पणतू यांचे पण भविष्य उज्वल करा,
*आपण जनतेचे काम कराच अशी काही अट नाही,* 
आपले व आपल्या नातेवाईकाची कामे केली तरी चालेल.
*आणि त्यातून वेळ मिळालाच तरच जनतेच्या अडचणींचा विचार करा*..
 *जनहितार्थ*..
😰🤪😂🤪😁
हा मॅसेज आपल्या पुरताच मर्यादित ठेवू नका व इतरांना पण या संधीचा फायदा घेऊ द्या त्यासाठी सर्व ग्रुप वर टाका.
☝️😜😰😵‍💫🥶🫥🙄💩

Friday, 21 June 2024

पैसा आणि जमीन.

 पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...


टप्पा १:- १९५०  ते १९७५


या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. 

सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३०  एकर जमिनीचे मालक... 

मोठे वाडे...  

दांडगा रुबाब... 

निसर्गावर चालणारी शेती... 

अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले. तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे. 

अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले. 

नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...

उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.

हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता. 


टप्पा २:- १९७५ ते १९९५ 


देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.

शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.

बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.

शेती आता भांडवलदाराची होऊ लागली.

विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.

पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.

राजकारण गावागावात घुसलं.

पुढारपणाच्या  नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या.

बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले. 

स्पर्धा वाढली.

आता नोकरी सोपी राहिली नाही.


हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.

वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.

२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला, पोरं बेकार फिरू लागली.


टप्पा ३:- १९९५ -२००९ 


हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.

परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.


मोठे उद्योग यांनी काबीज केले.

हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदि उत्तरेतील लोकांनी काबीज केली.

सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.


मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोअर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कुल वर चिटकवणे ह्यातच गुंतलेला दिसला.

२० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.

अजूनही पाटीलकी व  जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.


टप्पा ४:- २००९ ते २०२०  


ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले.

पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती  आल्या.

मग काय?

जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.

राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.

जमीनदारी संपली, पोरं बेकार किंवा पुणे-मुंबईत ८-१० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.

आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.

खरी, बिकट गरिबी सुरु झाली.

पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.

बापाकडे लग्नाला पैसा नाही.

मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.

गावचा जमीनदार हमाली करू लागला.

व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.


टप्पा ५:- २०२० ते २०३०


इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल.

ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार.

नोकरी हा विषय संपला आहे.

नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.

उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.

पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.

शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.


अजून वेळ गेली नाही.

शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा.

नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.


जो चूक करतो तो माणूस,

तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस,

जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस.


अजुन वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पहाण्यासाठी.


आपल्या माणसाला साथ द्या,

आपल्या माणसाला मोठ करा.

आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा.

आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे.


(सत्य परिस्थितीवर आधारीत असलेला हा लेख सोशल मीडियावरून घेतलेला.)

Friday, 14 June 2024

 *कौटुंबिक न्यायालयातील वादाचे खटले हाताळणाऱ्या..., न्यायाधीशांनी दिलेले महत्त्वपूर्ण दहा सल्ले!*

१) *तुमच्याबरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन देऊ नका*. 

*उलट, त्यांनी नवे घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर... अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे.*

 *वेगळे घर शोधणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुमची नाही. मुलाचे कुटुंब व तुमच्यामध्ये जितके अंतर असेल... तितके तुमचे नाते चांगले राहील.*

२) *तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे. हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा.* 

*ती तुमची मुलगी किंवा मैत्रीणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका.*

*तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो. पण सुनेचे तसे नसते.* *मुलावर रागवता.. म्हणून सुनेवर रागावला तर... ती कायम लक्षात ठेवते.*

*खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागावू शकते किंवा चुका सुधारू शकते.*

३) *तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणे ..ही तुमची समस्या नाही. ती तुमच्या मुलाची समस्या आहे. ती तुमची समस्या नाही, कारण आता ती सज्ञान आहे.*

४) *अगदी तुम्ही एकत्र राहात असला तरी... प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे सांगा.*

 *त्यांचे कपडे धुणे किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे...!* 

*अशी कामे करू नका. अगदीच सुनेने विनंती केली... आणि ते काम करण्याची तुमची शारीरिक, मानसिक क्षमता असेल तरच... ते काम करा.*

*त्या कामाच्या बदल्यात त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलाच्या कौटुंबिक समस्यांची तुम्ही काळजी करू नका. त्यांच्या समस्या ते सोडवतील.*

५) *जेव्हा तुमचा मुलगा आणि सुने दरम्यान वाद, भांडणे चालू असतील.. तेव्हा आपल्याला काहीच दिसत नसल्याची व ऐकू येत नसल्याची भूमिका घ्या.* 

*पती-पत्नीच्या नात्यामध्ये पालकांनी भाग घेऊ नये... असे तरुण दांपत्याला वाटणे स्वाभाविक असते...!* 

६) *तुमची नातवंडे ...ही पूर्णपणे मुलगा आणि त्याच्या पत्नीची असतात.,*

 *त्यांचे संगोपन कसे करायचे?*

 *हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे* 

*त्याचे श्रेय किंवा अपश्रेय त्यांच्या कडेच जाईल.*

७) *तुमच्या मुलाच्या पत्नीने तुमची सेवा केली पाहिजे.. व आदर बाळगला पाहिजे...असा नियम नाही.*

*ते तुमच्या मुलाचे कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक असते.* *जेणेकरून त्याच्या पत्नी बरोबरील नाते अधिक चांगले राहील.*

८) *निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे योग्य नियोजन करा, निवृत्तीनंतर मुले सांभाळतील या भरवशावर राहू नका.*

*तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि पुढच्या प्रवासात आणखी नव्या गोष्टी शिकायच्या आहेत हे लक्षात ठेवा.*

९) *निवृत्ती नंतरची वर्षे आनंदात घालवणे... हे तुमच्या हिताचे असते.* 

*जे काही कमावले आहे, साठवून ठेवले आहे...त्याचा वापर मृत्यूपूर्वी करणे सगळ्यात चांगले.* 

*आपली संपत्ती आपल्यासाठी शून्य होईल... असे होऊ देऊ नका.*

१०) *नातवंडे ही तुमच्या कुटुंबाचा घटक नसतात.*

*ती त्यांच्या आई वडिलां साठीची अनमोल देणगी असते.*

*हे केवळ तुमच्यासाठी नाही तर..*

 हे *दहा सल्ले तुमचे मित्र, पालक, नातेवाइकांनाही वाचायला द्या.*

*कौटुंबिक_समुपदेशन प्रत्येक आई वडिलांना मार्गदर्शक सुत्रे जज लोकांनी मांडली आहेत...* 

*वास्तव त्यांनी जनतेपुढे मांडले आहे.* व ते *अगदी सत्य आहे.*

 *प्रत्येक कुटुंबाला जगतांना कसे वागायचे? याचे सुंदर मार्गदर्शन विशद केलय!* 

*आजकाल मुलांना सुनांना त्यांचे स्वातंत्र्य हव असत...!*

 आणि *आई वडील नको असतात..!* कारण,

 *जो पर्यन्त पैसा त्यांचे कडुन अपेक्षित असतो... तो पर्यन्त गोडवा असतो.*

 *आई वडील जेव्हा परिस्थिती ने हतबल हो असहाय्य होतात..,* *तेव्हा, मुलांना नकोसे वाटतात.*

 कारण, *त्यांची सेवा करणे, त्यांना .. स्पेशली, सुनांना जड वाटते.. पण हेच तिच्या आई वडिलांना त्रास झाला तर.. तिच्या डोळ्यात पाणी येते... व लगेच त्यांना स्वत: कडे आणायची तयारी ...!* 

*हा दुजाभाव नसावा.*

*आई वडील सासु सासरे हे सारखेच असतात, फरक फक्त दृष्टिकोण कसा? यावर अवलंबून असतो.* 

*जीवनाच्या नौकेत प्रत्येक व्यक्ती ला हा प्रसंग कधीतरी येणारच आहे. म्हणुन.. आहे तोपर्यंत भरभरून जगावे...,* 

*आपण आपल्या साठी जगायला शिकायला पाहिजे... हे जीवन नश्वर आहे.*

 *कधी बोलवण येईल?*

*सांगता येत नाही. एक्झीट कॉल  आला की, कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. सार काही इथेच सोडुन जाव लागते. खाली हाताने माणुस जन्माला येतो, आणि जातांना पण खाली हातानेच..! मग कसला वृथा अभिमान बाळगायचा?*

 *पैसा ,अडका, शोहरत, जमीन जुमला, उंची कपडे, गाडी, बंगले, संपत्ती हे एक मृगजळाचा भास राहुन जाते...!*

 *अतृप्तपणे सार इथेच सोडुन जावे लागते.. याचा पश्चाताप जरुर होतो. पण शेवटी प्रारब्ध हा कुणालाच चुकले नाही.  म्हणुन ……,*

*ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असु द्यावे समाधान...*!

(आपणास मनापासून ज्यांना पाठवावे  असे वाटते...त्या त्या सर्वांना जरूर पाठवावे.)

Thursday, 16 June 2022

पुरातन काळात भाट समाजाचे महत्व आणि त्यांचा इतिहास........

           भाट हा शब्द संस्कृत शब्दातून उत्पन्न झालेला असून भाट म्हणजे स्तुतीपाठक, राज दरबारात गायन करणारे, वंशवळीचा इतिहास सांगणारे असे संबोधले जाते. भाट हे मुळतः राजस्थानचे असून साडे बारा जात म्हणूनही ओळखले जाते. ब्राह्मणांकडून चार्तुवर्णीय व्यवस्था आखली गेलेली होती. तसेच, कामानुसार वर्ग विभागणी करण्यात आली होती. वंशवळीचा इतिहास लिहीणारा आणि राजदरबारात गायन करणारा 'भाट' हा भटका समाज इतकच आकलन त्यावेळी झालेल. म्हणूनच आपल्या वंशवळीचा इतिहास जाणणाऱ्या या भाटांचा इतिहास तर बघायलाच हवा.भाटांच्या गायन व स्तुतीपाठक कामामुळे त्यांना वैश्यवर्णिय म्हणतात. वंशावळीचा इतिहास लेखन भविष्य सांगणे तसेच जानते घालण्याची पद्धत यामुळे त्यांना ब्राह्मणवर्गीय पण म्हणतात. परंतु ब्राह्मणांनी चातुवर्णीय व्यवस्थेनुसार भाटांना क्षत्रियांमध्ये स्थान दिले होते. भाटांच्या वस्तीस्थाना पासून त्यांना राजपूत भाट, गुजराती भाट, मराठे भाट अशी नावे मिळाली होती. त्यांच्यात राजभाट,ब्रह्मभाट, भारोट चारण, वोखा वहीवंचे, कंकाळीभाट, राणी मंगा भाट, मारवाड़ी भाट,चंद्रसा, बूनाशासनी, तूरी, वेदारी अश्या पोटजाती बघायला मिळतात.खानदेशात परदेशी भाट, मराठे भाट, कुणबी भाट असे तीन पोटभेद आहेत. विदर्भामध्ये व्हाड भागात वासुदेव, गोंधळी, कंजरभाट, गुरत हा भाट समाज आहे. पूर्वीच्या राजे राजवटींच्या काळात प्रत्येक राजांकडे एकतरी भाट असायचाच. पृथ्वीराज चौहान राजाकडे चंद्रदाई हकावी नावाचे भाट होते. बळीराजा जवळ पिंगळा, रामाजवळ रंपाळ, पांडवांजवळ सूत, कौरवांजवळ संजय होते. भाटांचे मुख्य काम म्हणजे राजाची स्तुती गायन पद्धतीने करणे. राजाच्या वंशावळीचा इतिहास व वर्णन काव्यरुपात करणे, भाट हे बोलके होते. स्पष्टवक्ते असायचे हा गुण चांगला आणि दोषयुक्त ही संबोधू शकतो कारण, त्यामुळे राजेलोक त्यांच्याशी थोडे जपूणच असतं. त्याकाळात कोणताही राजा भाटाची हत्या करित नव्हते. भाटानी लिहिलेले लेखन हे ताडाच्या पानावर असायचं. त्यांनी रचलेल्या कवनांना अष्टपदी, कुंडली. चौपाई. छप्पा, सवाई. दोहे, कबीत छंद प्रबंध, गीत केहेवत असे म्हणतात. भाट स्पष्टवक्ते सहीत स्वामीनिष्ठ होते. प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा यामुळे भाटांना राजदरबारात राजे खूप मान द्यायचे. अकबर बादशाहा देखील खूप मान द्यायचा, राजांच्या कुटुंबासोबत परगावी जाण्यासाठी भाटांना सोबत पाठविण्याची पद्धती होती. तेव्हा भाटांजवळ कट्यार किंवा भाला यासारखी शस्त्रे असायची. भाटांमध्ये वेगवेगळे पंथ आहेत. कबीर पंथी, शैव, वैष्णव, रामनंदी, स्वामीनारायण इ. ब्राह्मणांप्रमाणे भाटामध्ये उपनयनादि संस्कार करण्याची पद्धत होती, भाटामधील कंजर भाट ही जात गुन्हेगार म्हणूनही प्रख्यात होती. महाराष्ट्रात भटक्यांपैकी १३ भटक्या जमाती गुन्हेगार म्हणून घोषित केल्या होत्या फासेपारधी, कंजारभाट, पेंढारी याजातींना इंग्रजही फार घाबरायचे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना मुक्त केले. पृथ्वीराज चौहान राजाच्या दरबारी चंद्रदाई हकावी नावाचा विश्वासू भाट होता. महम्मद गोरीने राजा पृथ्वीराज चौहानला पकडून आणून त्यांचे दोन्ही डोळे फोडले आणि त्यांना बंदी बनविले जेव्हा आपल्या राजाच्या शोधार्थ चंद्रभाट महम्मद गोरीच्या दरबारात आले तेव्हा, चंद्रभाटाला पृथ्वीराजांचे शौर्य माहीती होते. ते महम्मद गोरीला बोलले की, तुला राजांनी सोळा वेळा माफ केले. त्यांची हीच चुकी झाली. असे बोलताच, गोरीने हकावीला सुद्धा बंदी केले. गोरीनी तिरंदाजी खेळाच आयोजन केले हुशारीने त्यात चंद्रभाट आणि पृथ्वीराज चौहान यांनी प्रतियोगीतेत सहभाग घेतला. राजा पृथ्वीराज चौहानला 'शब्दभेद बाण' ही धनुरविद्या कला येत होती. नियमानुसार प्रतियोगितामध्ये कुणीही भाग घेवू शकतो. याचाच फायदा चंद्रभाट आणि राजा पृथ्वीराज चौहान यांनी घेतला होता. चंद्रभाटाने खास शैलीतून काव्य गायन केले. गोरी कुठे आहे हे त्यांना दोह्याच्या माध्यमातून सांगितले.


चार बास चौबीस गज़

अंगुल अष्टप्रमाण

ता उपर सुलतान है।

मत चुके चौहान


हा दोहा गायन करताच राजा पृथ्वीराज चौहान यांनी बाण त्या दिशेने चालविले. महम्मद गोरी जागीच मरण पावला. शेवटी शत्रुच्या हातून मरण्यापेक्षा राजाने चंद्रभाटला स्वःताची हत्या करण्यास सांगितले पण, राजाची हत्या केल्यानंतर स्वामिनिष्ठता भंग होवून विश्वासूपणा वर डाग लागणार हे चंद्रभाटला माहीती होते म्हणूण चंद्रभाटने स्वःताची हत्या राजाला करण्यास सांगितले या घटनेनंतर भाटांना राजस्थानमधून बाहेर काढण्यात आले होते. ज्याप्रकारे फाळणीमध्ये काही मुस्लिम समाज भारत देश सोडून गेले नाही. त्याचप्रकारे काही भाटांनी ही राजस्थान सोडले नाही ते आजही तेथे वास्तव करीत आहेत. उदयपुर भागात भाट समाज मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. फणसवाडी, करडवाडी, गारगोटी, सोनाली, खानापूर, कासारवाडा, मुरगुड, वाळवा, निगपे येवती चये, म्हाळुंके, बेले. बेलवले, कुरुकली, कुरूवली, कोथळी, राधानगरी, येलवडे, हसुर, सावर्डे, सदोली, हिरावडे, बचनी, बहिरेश्वर, आरे, बीड माठे, खांधंगळे, कोंगे, सातारडे, म्हारूल, यावलुज, साबळेवाडी, भाठवडे, बांबवडे या शहरामध्ये हा समाज वास्तव्यात आहे. राजस्थान सोडलेल्या भाटांनी मात्र स्वःताच्या उपजिविकेसाठी साडे बारा प्रकारची कामे केली आणि त्यावरून सोनारभाट, कलारभाट, माळीभाट, राजभाट इ प्रकारची साडे बारा जाती म्हणूण ओळखली जाणारी जात म्हणजेच 'भाट' आहे. आता ना राजे-राजवाडे राहीले ना त्यांच्या पदरी असलेले भाट राहीले आता भाट समाज विविध व्यवसाय करण्यात गुंतलेला आहे परंतु, त्यांच्यामुळे कितीतरी काव्यांचे प्रकार आणि शैली लोकांना माहीती झाल्या. अश्या भाटांचा इतिहास सगळयांना माहीती व्हायला हवा.







लेखन 

सौ.नूतन अशोक मुळणकर

नांदगांव

जिल्हा-नाशिक

यांचे सौजन्याने