Saturday, 13 September 2025

चंद्रपुरात झालेला 13 सप्टेंबर च्या रात्रीचा पाऊस म्हणजे ‘कहरच होता,'

 *चंद्रपुरात झालेला आताचा पाऊस म्हणजे ‘कहरच होता*

मेघगर्जना, विजाचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि धो धो पाऊस….

जेव्हा पासून समज आली तेव्हापासूनचा सर्वात खतरनाक पाऊस पाहण्याचा, अनुभवण्याचा अनुभव…

रात्री यावेळेस सुध्दा झोप विसरुन, अनेक परिवार घरात एके ठिकाणी एकत्र बसून असल्याचा अनुभव प्रथमच घेत आहे…

चिंता वाढविणारे ते २० मिनिटे…

तुमाच्याकडे?

चंद्रपूरमधील रौद्र पाऊस आणि वाढलेली भीती…

१३ सप्टे २०२५, वेळ ११:४० pm 

     चंद्रपूरमध्ये नुकताच झालेला पाऊस म्हणजे नुसता कहरच! मेघगर्जनेचा प्रचंड आवाज, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि धो धो कोसळणारा पाऊस… हा अनुभव मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घेतला. ज्या क्षणापासून मला समज आली, त्या क्षणापासूनचा हा सर्वात खतरनाक आणि थरारक पाऊस होता.

      रात्रीची वेळ होती, एरव्ही शांत होणारा आमचा म्हाडा कॉलनी, दाताळा, परिसर आज निसर्गाच्या या अचानक बदललेल्या रूपामुळे पूर्णपणे जागे झालेला होता. (बहूतेक शहरात सर्वत्र) सगळेजण झोप विसरून आपापल्या घरात एका कोपऱ्यात एकत्र बसले होते. सकाळपासूनच इरई धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू होताच, इकडे पठाणपुरा गेट बाहेर आणी विठोबा खिडकी बाहेर पाण्याच्या पातळीत वाढ असलेला एकखाद दूसरा सांगतच आहे आणि त्यातच अशा ढगफुटीसारख्या पावसाने परिस्थिती आणखीच भयावह बनली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच चिंता होती. ती २० मिनिटे तर अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारी होती.


आम्ही सारे खिडकीतून बाहेर बघत होतो. जेव्हा वीज चमकत होती, तेव्हा सारा परिसर एका क्षणात लख्ख प्रकाशात न्हाऊन निघत होता. त्या क्षणासाठी थोडं कुतूहल जरी वाटले, तरी दुसऱ्याच क्षणाला विजांचा कडकडाट आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी पुन्हा एकदा थरारक वातावरण निर्माण करत होत्या. जणू काही निसर्गाने आपलं रौद्ररूप दाखवलं होतं.


तो अनुभव केवळ पावसाचा नव्हता, तर निसर्गाच्या शक्तीचा आणि त्यासमोर आपण किती लहान आहोत याची जाणीव करून देणारा होता. तो क्षण भीतीदायक असला तरी, एकत्र येण्याची आणि संकटाचा सामना करण्याची एक वेगळीच शिकवण देऊन गेला.