Saturday, 18 July 2020

कोरोनाच्या धास्तीवर बोलू काही.




कोरोना सर्वांना होणार आहे, लक्षात ठेवा

   अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला, की आपण ह्या कैद्यावर काही  प्रयोग करूयात. तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारू.
.
   त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेल्यानंतर त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले. आणि त्याला साप डसवून नाही, तर दोन सेफ्टी पिन्स टोचण्यात आल्या आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा दोन सेकंदात  मृत्यू झाला.
.
   पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं, की कैद्याच्या शरीरात सापाच्या 'व्हेनम'सदृश्य विष आहे.
.
   आता हे विष कुठून आलं, की ज्यामुळे कैद्यांचा जीव गेला? ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं!
.
    आपल्या प्रत्येक संकल्पामुळे पॉजिटिव किंवा  निगेटिव एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात Hormones उत्पन्न होतात.
.
   90% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे.
.
   आज मनुष्य आपल्या चुकीच्या विचारांनी भस्मासुर बनून स्वत:चा विनाश स्वत:च करतोय.
.
   माझ्या मते कोरोनाला  मनाला लावुन घेऊ नका, कोरोना पाॅजिटीव्ह असणारे 5 वर्षाच्या मुलापासुन ते 80 वर्षा पेक्षा जास्त वयस्कर सुद्धा निगेटिव्ह झालेत.
.
   आकडेवारी वर जावु नका कारण आर्ध्या पेक्षा जास्त लोक व्यवस्थित आहेत,आणी मृत्यु पावणारे फक्त कोरोना आजारामुळे गेलेले नाहीत त्यांना दुसरे पण आजार होते त्यामुळे ते याचा मुकाबला करू शकले नाही.
.
   लक्षात ठेवा कोरोनामुळे आतापर्यंतचे सर्व हाॅस्पीटल मध्येच मरन पावलेत घरी कोणाचाही मृत्यु झालेला नाही. हाॅस्पिटल मधील वातावरण आणि मनातील भीती.


बघा हा डॉक्टरांचा विडिओ :-   

 
   ३५ दिवस जहाजावर असणाऱ्यांना कोरोना कसा झाला एक प्रश्न बघा युट्युब वरील विडिओ :- Click Here

चला आता थोडा कोरोना विषयी विनोद बघूया आणि हा विडिओ बघून मनावरील ताण कमी करूया
          १)  :- Click Here 
         २) :- Click Here
        ३) :- Click Here 

 

.
   हा कोरोना सर्दी खोकला या पेक्षा मोठा आजार नाही.
आपले विचार सदैव सकारात्मक ठेवा आणि आनंदी रहा. 

           म्हणून आपणास विनंती आहे की, आपल्या आजूबाजूला कोरोना रुग्ण सापडत आहेत, याचे जास्त टेन्शन घेऊ नका. हे कधीना कधी होणारच होते, त्याची सुरुवात आहे असे समजा. सगळ्यात महत्वाचे जो कोणी कोरोना positive होईल त्याच्या बद्दल, भीती,  घृणा मनामध्ये आणू नका, कारण ही वेळ कोणावरही येऊ शकते. पण सगळ्यात महत्वाचे  या आजाराला जास्त घाबरू नका. अनेक तज्ञ डॉक्टरांचे म्हणने आहे की रोगा पेक्ष्या त्याच्या भीतीने जास्त लोक मरत आहेत, फक्त भीती आणि हार्ट अटॅक ने. कोणतीही negative बातमी पसरू देऊ नका. एकमेकांना सतत फोन वर बोला, मन हलकं करा, कोरोना वर जास्त बोलू नका, बोलला तर फक्त चांगलं बोला. दुसऱ्याला आधार वाटेल असेच बोला. आज सगळे चिंतेत आहेत त्यामुळे खाली उतरायला पण घाबरतात. काळजी घ्यायचीच आहे, पण मानसिक त्रास होईल इतकी पण नाही. तणाव हा वेगळ्या आजारांना आमंत्रण आहे. तणाव रहित राहायचे तर, एकटे कोंडून घेऊन चालणार नाही. मोकळा श्वास घ्या, सर्व मित्रांशी कायम बोलत राहा. त्यातून मन हलकं करा. ही आजच्या काळाची गरज आहे. सर्वांशी कायम बोलत राहा, फक्त कोरोना विषयी अजिबात बोलू नका, किंवा चांगले फक्त धीर देणारे बोला. बघा फरक वाटेल, मन शांत होईल, चांगली झोप लागेल, आणि तरच तब्बेत चांगली राहील. अजिबात घाबरू नका आणि दुसर्यांना घाबरवू नका ही विनंती.
*महेश बुचुंडे, म्हाडा कॉलनी, नविन चंद्रपूर*

Friday, 3 July 2020

लढा जात प्रमाणपत्राचा !

शासनानेच  दिलेले जात प्रमाणपत्रधारक समूह “बोगस” कसे - ऑफ्रोह संघटना*


लढा जात प्रमाणपत्राचा !

     स्वार्थी राज्यकर्त्यांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या षड् यंत्रमुळे केंद्र सरकारकडून१९५६ ला क्षेत्राबंधनाचा कायदा लागू केला. त्यात लहान मोठ्या ४७जमातींचा समावेश आहे. Shedule Tribe Order(Amendment) Act No. ६३/१९५६ असे म्हटले आहे. त्यामुळे पुणे; ठाणे; नाशिक; अहमदनगर; रायगड येथील निवडक आदिवासी जमातींना अनुसूचित जमातीचे सर्व लाभ मिळत होते. परंतु क्षेत्रबंधन सोडून विस्तारित क्षेत्रातील (OTSP) इतर जिल्ह्यामध्ये राहणारे आणि आदिवासी जातीत मोडणारे कोळी महादेव; कोळी ढोर; कोळी मल्हार; टोकरे कोळी; हलबा; हलबी; ठाकूर; का-ठाकूर; ठाकर; मा-ठाकर; माना; मुन्नेवार;मुन्नेरवारलू; छत्री; गोंड; गोवारी; मन्नेपावर;धोबा; धनगड; धनवर; बिंझवार; इंजेवार; सोनझरी इ. ३३ जमातींना १९५६ते १९७६ पर्यंत अनुसूचित जमातीचे फायदे मिळणे बंद होते. त्यामुळे आर्थिक; शैक्षणिक; सामाजिक; राजकीय प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात बाधा आली हे केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्यावर विस्तारित क्षेत्रातील आदिवासी लोकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी Shedule Cast &Shedule Tribe Order (Amendment) Act No. १०८/१९७६ चा कायदा केला. त्यामुळे १९५६ चे क्षेत्रबंधन हटविले. त्यामुळे विस्तारित क्षेत्रातील अनुसूचित जमातींना आरक्षणाचे फायदे मिळू लागले. हा कायदा १८ सप्टेंबर १९७६ ला पारित झाला आणि २७ जुलै १९७७ ला अस्तित्वात आला.
     क्षेत्रबंधनातील आदिवासी व क्षेत्रबंधनाबाहेरील आदिवासी (विस्तारित क्षेत्रातील) असे दोन गट निर्माण झाले. दोन्ही क्षेत्रातील आदिवासी समाज अडाणी असल्याने ते उदरनिर्वाहासाठी जे काम करत होते तशा त्यांच्या जातीच्या नोंदी चुकीने झाल्या. काही विसंगत नोंदी आढळतात. परंतु महाराष्ट्र शासनाने सर्वच आदिवासींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय सी. बी. सी.-१४८१/(७०३)/D. V. दि.३१/७/१९८१ या शासन आदेशाच्या निकषाने जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार/ विभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्याचे आदेश केले. त्यामुळे क्षेत्रबंधनातील व विस्तारित क्षेत्रातील आदिवासींना एकाच निकषाने जात प्रमाणपत्र मिळाले. मग शासनाने दिलेले अधिकृत जातीचे प्रमाणपत्र ज्यांच्याजवळ आहे तो आदिवासी समाज बोगस कसा? हे सिद्ध करा. जर हे प्रमाणपत्र बोगस असेल तर असे प्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यावरही२३/२००० च्या जात प्रमाणपत्र पडताळणी कायद्यातील तरतुदी प्रमाणे दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. जोपर्यंत आपण बोगसपणा सिद्ध करत नाही; एक तर ते खोटे आरोप करणे थांबवा अन्यथा अशा संघटनांवर; व्यक्तीवर; अन्य यंत्रणेवर मानहानीचा दावा ठोकणार असलेचे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन (OFROH) महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर; राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते:; सचिव गजानन सोरते यांनी प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले.
     अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तपासणी समित्या व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) पुणे ह्या व क्षेत्रबंधनातील ऑफ्रोट सारख्या संघटना व तथाकथित लोकप्रतिनिधींच्या हातचे बाहुले झाले असून या तथाकथित खरे आदिवासी समजणाऱ्या ऑफ्रोट सारख्या संघटना; काही लोकप्रतिनिधी; मंत्रालयातील व आदिवासी विभागातील उच्च पदस्थ अधिकारी यांच्या इशाऱ्यावर या संस्था चालत आहे. जर माजी मंत्री मधुकर पिचड ; कै. गोविंद गारे (माजी संचालक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे) यांच्या जातीच्या नोंदी हिंदू कोळी असून ते जर खरे आदिवासी असू शकतात त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत असेल तर विस्तारित क्षेत्रातील हिंदू कोळी समाज तसेच हजारों वैधता प्रमाणपत्र असलेल्या हलबा; हलबी समाज; ठाकर; ठाकूर समाज; मन्नेवार; मन्नेरवारलू सह ३३ आदिवासी जमाती बोगस कशा असा प्रश्न ऑफ्रोह ने उपस्थित केला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या च्या चुकीच्या कामकाजासाठी उच्च न्यायालयाने लाखोंचा दंड ठोठावला. त्याचबरोबर जात पडताळणी समित्या ह्या लाचखोर आहेत ह्या सर्व बाबी समाज; लोकप्रतिनिधी; मंत्री; प्रसार माध्यमांजवळ आम्ही सांगणार आहोत असे शिवानंद सहारकर यांनी सांगितले.

सौजन्य :- भूमिपुत्राची हाक :- Link 

चंद्रपूर कोरोना शतक पार.

चंद्रपूर कोरोना शतक पार :  जिल्ह्यात एकूण बाधित 102 


     चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्री उशिरा चार नवीन बाधित मिळाले तुकूम, उर्जानगर, वरोरा, गडचांदूर येथील हे बाधित आहे.देशात कोरोना चे संक्रमण आले आणि सुरुवातीच्या काळात चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र या जिल्ह्यातही आता कोरोना ने शतक पार केली आहे.

     चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या दोन जुलै रोजी रात्री उशिरा 102 वर पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने रात्री उशीरा दिलेल्या माहितीनुसार चारही बाधित गृह व संस्थात्मक अलगीकरणातील आहे.

     चार नव्या बाधितामध्ये वरोरा येथील कासम पंजा वार्डमधील संपर्कातील ३४ वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे. तर चंद्रपूर शहरातील ऊर्जानगर भागातील नवी दिल्ली येथून आलेला ३३ वर्षीय पुरुष, तुकुम भागातील सिकंदराबाद येथून आलेल्या २१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ऊर्जानगर व तुकूम परिसरातील दोन्ही बाधित संस्थात्मक अलगीकरणात होते. तर चौथा बाधित गडचांदूर येथील एसीसी कॉलनीतील रहिवासी आहे. हा २४ वर्षीय व्यक्ती दिल्लीवरून कोरपना तालुक्यातीत गडचांदूर आवाळपूर येथे आल्यानंतर गृह अलगीकरणात होता. काल १ जुलैला चारही नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चारही बाधितांची प्रकृती स्थिर आहे

     जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) आणि २ जुलै ( २ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १०२  झाले आहेत. आतापर्यत ५६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १०२  पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४६ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.