"एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, ऐकायला वाईट आहे, समजायला कठीण आहे, पण सत्य आहे. काय माहित आहे, मला काय सुचलं चार दिवसापूर्वी एका मिटिंग मध्ये विचारलं मी आणि साहेब मला एका आठवीच्या पोरानी उत्तर दिलं नाशिक मध्ये परफेक्ट उत्तर दिले एवढेच लोक होते हे असे, मी तुम्हालाही विचारतो, अंतःकरणा पासून सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच राज्य चांगलं होतं का आत्ताचे जे सरकार येते यांचे राज्य चांगले आहे? काय वाटतं, कोणाचं राज्य चांगलं होतं? मनमोकळे पणाने आपल्याला कोणाचं काई हे करायचं नाही, तुम्हाला काय वाटतं
--------- "शिवाजी महाराजांच, मलाही तेच वाटतं, माझाही तेच म्हणणे आहे, पण एक बारकाईने विचार करा शिवाजी महाराज्यांच्या काळात तुम्हाला गावाला सिमेंट रोड बांधून दिला काय, डांबरी रस्ता दिला का? अंगणवाडी बांधून दिली का? शाळा बांधून दिली काय? पोराला कपडे दिले का? खिचडी दिली का? मास्तर दिला का? आधार कार्ड दिले का? इलेक्शन कार्ड दिले का? श्रावण बाळ होतं का? अर्ध तिकीट होता का एस. टीचं? घरकुल होतं का?
--------------------काय होतं म्हणून चांगले होतं? इतक्या ह्या सरकारने योजना काढल्या ज्याची यादी एवढी मोठी होईन लिहायला घंटा लागेल, एवढया योजना समाजासाठी काढून सुद्धा समाज सुखी नाही. त्या काळात काहीही हे नसताना ते राज्य चांगलं होतं, अन समाज सुखी होता याच कारण काय आहे, याचात दोन तीन गोष्टीचचं कारण गुंतलेल आहे. एक छत्रपती शिवाजी महाराज तोंड पाहून काम करत नव्हते,
------- समान, सगळ्या जातीला सारखा न्याय, प्रत्येक माणसाला सारखा सारखा न्याय आता ते राहिलं काय?
...... नाही राह्यलं आणि त्या काळात मला ते अजून काय कारण आहे. मला ते काय सांगितलं त्या आठवीच्या पोरांनी माहिती आहे, शिवाजी महाराजांनी बरेच कष्ट करून लोकांना जगायला शिकवलं. त्यावेळचे लोक कष्ट करत होते, आणि कष्टाचं खात होते. आता आम्हाला कष्ट नको फुकट..... , फुकट लुटायला पाहिजे आणि तेबी किती पोटापुरतं नाही, हजार कोटी, दोन हजार कोटी, चार हजार कोटी, अरे सालं यांच्या विमानाचा बॉम्ब स्फोट व्हायला पाहिजे वरच्यावर. होय न हो मला ते ऐकून इतकी तिडीक येते हो साहेब कि काय सांगू. काय करता हो त्या पैश्याला आमच्या शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना एक टोपलं भरून सोनं हिरे भेट दिले होते. सत्य घटना आहे. तुकाराम महाराजांनी घेतलं नाही. मला कशाला पाहिजे म्हणे हे, आहे ते लोकांना वाटून दिलं. चारशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी लोकांचे कर्ज माफ केलं, सावकार होते महाराज, दुष्काळ पडला कर्जमाफ, जावा म्हणे, त्या वह्या जाळून टाकल्या, आहे ते धन वाटून दिलं, तेव्हा..... आणि आता काय मारामारी आहे पहा, चारशे वर्षांत काय प्रगती आहे आमची? घेतलं नाही, शिवाजी महाराजांचे धन वापस करून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे धन वापस पाठवनं, सोपी गोष्ट आहे काय?
तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला सोने-नाणे आम्हा मृत्तिके समान, हे अभंग आपण नेमेचि म्हणतो तरी मध्यांनाचे हजार घेतो म्हटल्यावर लैच हलकट आहे न सालं, ह्याला बुटानं हानलं पाहिजे याला"
"काय कळलं आम्हाला, ना तुकाराम कळला ना शिवाजी कळला."










