बालपणींचे काही विनोदी किस्से
मित्रांनो बालपणी बरेच बालक हे द्वाड, खोडकर असतात, प्रत्येकांच्या बाबतीत काही ना काही किस्से असे घडलेले असतात की, ते आयुष्यभर साठवणीत असतात. तसा मी मध्यमवर्गीय नोकरीपेशा कुटुंबातील मुलगा, वडिलांची बदली जेथे तिथे शिक्षणासाठी राहावे लागत. कधी झाडी मध्ये तर कधी वऱ्हाडात, कधी शहरात तर कधी छोट्या गावात.
मात्र दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जाण्याचा आनंद काही औरच असायचा, त्यामुळे शाळेतील मित्र वेगळे तर सुट्टीतील मित्र वेगळे, गावातील मित्र सुद्धा सुट्टीची आतुरतेने वाट बघायचे, मग धमाल असायची, त्यामुळे आजी आजोबांच्या पुरते नाकी नऊ व्हायचे.
उन्हाळ्याच्या सुट्टीतील एक गमतीदार किस्सा, आमचे मित्र दिवाकर, प्रसाद आणि मी आजोबाच्या शेताजवळ लागून असलेलं रामदास म्हाली यांच्या शेतातील कलमी गोड आंबे आणायचा आम्हा तिघांचा बेत ठरला. दिवाकर हा गावातील मित्र तर प्रसाद हा आमच्यासारखाच बाहेरगावहून म्हणजे शहरातून आलेला एक नात्यातीलच मित्र. दिवाकर हा गावातील असल्यामुळे तो खूप गबाळ्या सारखा असायचा, परंतु धडधाकट, व काटक होता. गावातील शेत शिवार, संपूर्ण गल्लीबोळातील माहिती त्याला असायची. त्यामुळे या मिशनचा कॅप्टन तो होता, मिशनची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आम्ही सोपविली, रामदास म्हाली हे कॅरेक्टर म्हणजे एक जाड भिंगाचा चष्मा लावलेला दूरचे न दिसणारा, अंगात पांढरा कुर्ता आणि धोतर असा पेहराव असलेला, गावातील सारेच सान थोर त्याला रामदास म्हाली म्हणूनच आवाज द्यायचे. त्याच्या आणि आजोबांच्या शेताच्या अगदी बॉर्डर वर एक खोलगट पण अरुंद पात्र असलेला नाला (ओढा) वाहत असायचा. परंतु उन्हाळ्यात त्यात पाणी नसायचे. त्या नाल्यापासून अगदी अंदाजे दोनशे मीटरवर ते कलमी पेवंदि गोड आंब्याचे झाड होते. त्याचे आंबे कच्चे असले तरी गोड असायचे.
आमचा कॅप्टन समोर आणि दोन सैनिक असे हे आमचे मिशन सुरु झाले. कॅप्टन दिवाकर हे दोन सैनिकांना नाल्यामध्ये पोझीशन घ्यायला सांगून संपूर्ण शेताची तसेच आंब्याच्या झाडाची रेकी करून आले. "रामदास म्हाली याचे लोकेशन शेताच्या तिसऱ्या बांधावर असून तो गुरे चारत आहे, आपणास चांगली संधी चालून आलेली आहे" असे कॅप्टन नी सांगताच, बाकी सैनिक "हरभरा हर हर महादेव" असा नारा ठोकून, आंब्याच्या झाडावर चाल करून गेले. दिवाकर हा कॅप्टन असल्यामुळे तसेच झाडावर चढण्यास पारंगत असल्यामुळे तो झाडावर चढेल व दोन्ही सैनिक खाली राहून आंबे गोळा करतील, असे नियोजनानुसार ठरले. त्याप्रमाणे कॅप्टनने झाडावर चढून पटापट आंबे खाली टाकावयास सुरुवात केली. कॅप्टन दिवाकरच्या दुपट्यात खाली पडलेले आंबे जमा करावयाचे काम दोनही सैनिक करू लागले. सारी चमू आपापल्या कामामध्ये तल्लीन झाली होती, हे वातावरण अतिउत्साहात कधी बदलले कळलेच नाही.
"अबेSSSए , दिSSSव्या..... हा आंबा पिकला आहे, तो-तो त्या फांदीवरचा.... , त्या त्या, तो तिकडे, वर.... वर, अजून वर .................... , अबे खाली" असा मोठयाने आवाज चहुबाजुकडे कधी घुमू लागला हे कळलेच नाही. असा बराच वेळ निघून गेला.
तेवढ्यात, "च्याSSSSSयला, थांबा तुमचे कंबरडे मोडतो, भडवीच्या" असा मोठयाने आवाज येताच सारे वातावरण चिडीचूप झाले. बघतो तर काय, रामदास म्हाली हातात भली मोठी काठी घेऊन ओरडत ओरडत आमच्या दिशेने धावत येत होता. क्षणात उत्साहाचे वातावरण दहशतीत बदलले. दोनही सैनिकांना पळताभुई थोडी झाली. धावता धावता रामदास म्हाल्यानें आमच्याकडे भिरकावण्यासाठी वाकून एक दगड उचलण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात त्याचा चष्मा खाली पडला. कॅप्टन महोदय दिवाकर हे झाडावरच अडकले. "अबे ए दिSSSव्या ..... उतर, खाली उत्त्त्तर, उडी मार" असे म्हणत दोनही सैनिक नाईलाजाने नाल्याकडे हातात येतील तेवढे आंबे घेऊन पळत सुटली. तोवर रामदास म्हाली झाडापर्यंत येऊन पोहोचला. त्याने शिव्या देत देत सारे दुपट्ट्यातील तसेच खाली पडलेले आंबे जमा करून बांधले. झाडाकडे वर बघत बघत दोन शिव्या हासडल्या, वर पहात पहात झाडा भोवताली चकरा मारू लागला.
त्याच वेळी मात्र नाल्यात लपून बसलेले आम्ही दोन्ही सैनिक अतिशय घाबरून जाऊन एकमेकांशी पुटपुटू लागलो. "अरे, या...र ! आता आपला दिवाकर कॅप्टन शहीद होणार, आपण सापडले जाऊ, घरी मार मिळेल तो वेगळाच.
तेवढयात रामदास म्हाली, आमच्या दिशेने, "भडवीचे, कोणाचे पोरं होत का? पुन्हा या बरं साSSS लं, पोलीस स्टेशनंला रीपोटच देतो" असे म्हणत येऊ लागला, आम्ही मात्र नाल्यात आणखी दूर जाऊन लपून बसलो. शेवटी रामदास म्हाल्याचा नाईलाज झाला. तो झाडाजवळ परतला. आंबे दुपट्ट्यात बांधून परत आपले कामावर जाऊ लागला, जाता जाता रस्त्यात पडलेला चष्मा त्याने शोधला, तो गवतावर पडल्यामुळे सुरक्षित होता. मी थोड्या गवताच्या काड्या हळूच बाजूला करून पहिले असता तो दूर जातांना दिसला, तसा आम्ही सुटकेचा श्वास सोडला.
आता मात्र झाडावर राहिलेल्या दिवाकर कॅप्टनचे हालचाल जाणण्यास आम्ही आतुर झालो. तसे आम्ही झाडाकडे वळलो. झाडाजवळ पोहोचताच धप्प असा वाळलेल्या पालवीवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. "अरे, मेलोरे बावा! मेलोSSS " असा ओरडत हात पाय जोरजोरात खाजवत दिवाकर खाली कोसळला. बघतो तर काय, त्याचे झाडावरील चावऱ्या मुंग्या (बांबोडे) चावून चावून हात पाय सुजले होते. आम्ही त्याला विचारले, "अबे लवकर उडी का मारली नाहीस, बे!" त्यावर तो म्हणाला, "अबे, त्यानं मले, वरखलं असतो तर, तो माह्या घरी येऊन, तुमचं न माह्य सालट काढलं असत, म्हणून मी आनीक वर चढलो, त सालं.... बांबायन खाल्लं ." आणि तो रडायला लागला. त्यानंतर आम्ही आमच्या रुमालाने त्याच्या पायावरील मुंग्या घासून घासून काढल्या व घरी आणले.

असा हा रोमांचक विनोदी किस्सा आमच्या आयुष्यभर आठवणीत राहील.

पुढील भागात आणखी काही गमती घेऊन भेटूच.

No comments:
Post a Comment