Thursday, 20 May 2021

शिक्षक आणि टवाळखोर पानवाला...........

 टवाळखोर पानवाला  एका शिक्षकाला नेहमी नेहमी टोमणे मारायचा, म्हणायचा,

"शिक्षकांना काम कमी आहे आणि पगार जास्त" 


एक दिवस शिक्षकाची सटकली. 

तो म्हणाला - "एक पान किती रूपयाला आहे ?"


पानवाला म्हणाला, "10 रुपयाचे."


 शिक्षक - ठीक आहे. आजपासुन याच पानाचे मी तुला 20 रु. देतो.


फक्त काही *नियम* पाळावे लागतील. 

हे घे रजिस्टर, यात प्रत्येक पानाची माहिती लिहायची.


*उदा :-*


1. हे पान कोणत्या झाडाचे आहे?

2. ते झाड़ कोणत्या शेतात आहे?

3. त्याची  पाने  केंव्हा तोेडली?

4. त्याची तारीख, तुझ्या दुकानात आणल्याची तारीख?

5. या पानात जे जे टाकले त्या कात, चुना, सुपारी, इ. पदार्थांची माहिती ? मला लेखी स्वरुपात द्यायची.

6. त्यावर तुझी सही करायची. 

7. माझी सही घ्यायची.

8. माझ्या हेडमास्तरची सही घ्यायची.

9. पान खाण्यापूर्वीचे माझे वर्णन.

10. पान खाल्ल्यानंतर ची माझी स्थिती.

11. येणार्या प्रत्येक माणसाची लेखी नोंद ठेवायची ,

12. प्रत्येक माणसाची मस्टर वर सही घ्यायची.

13. नवीन गिर्हाइक आले तर त्याचा अँडमिशन  फॉर्म भरून घ्यायचा.

14. प्रत्येक गिर्हाइकाला मार्गदर्शन व समुपदेशन करायचे,

15. वाईट वागला तर शिक्षा करायची.

16. रोज आला तर कौतुक करायचं.

17. येत नसेल तर प्रबोधन करायचे.

18. पानपट्टी बंद केल्यावर गिर्हाइक शोधत फिरायचे.

19. सरकारची मोहीम आली की त्याच्या नोंदी करायच्या.

20. गावातील लोकसंख्या मोजायची .

21. पान खाणारे आणि न खाणारे शोधायचे.

22. ही सर्व माहिती लिहायची

आणि

23. नंतर ती मी सांगतो त्या software वर entry करायची.

24. सदरचा आढावा घेतला असता काही त्रुटी आढळल्यास त्याच्या परिणामाची जबाबदारी तुझी राहील.


इतके सांगेपर्यंत तो पानवाला चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडला होता. . .


🇮🇳  *शिक्षकांसोबत पंगा घ्यायचा नाही.👊🏻*


कारण त्यांना जो पगार मिळतो तो 

शिक्षणाचा,कामाचा व अतिशय ताणतणावाचा

आणि

सर्वात महत्वाचे

वरिष्ठांना सहन करण्याचा असतो......

😜😀


*तात्पर्य :-*

"पगार किती आहे ? शिक्षण किती आहे? 

 ह्यापेक्षा कामाचे स्वरूप कसे आहे ?

कोणत्या परिस्थितीत

 काय काम करावे लागते?

याचा देखील विचार करावा

आणि मगच बोलावे"

.*Dedicate to all Teachers*

======== Whatsaap Collection ========

Wednesday, 19 May 2021

श्रद्धा म्हणेचच विश्वास.

विधिलिखित


 खरी अंधश्रद्धा कोणती?


फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिवरायांना मानले,

शिवरायांनी संत तुकारामाना मानले,

संत तुकाराम महाराज यानी विठ्ठल-पांडुरंगाला मानले,

पांडुरंग दगडाचा देव, त्या मुर्तीला पूजतो मी.


दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी.


माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी.

का?

--अन्नदान होते.

--दवाखाना चालतो.

--शिक्षण संस्था चालते.

--परिसराचा विकास होतो.

आणि हो...

-देव/मंदिर फक्त भटजीसाठी नसतात.

-- मुर्तीकार,

-- फुलझाडे लावणारा शेतकरी,

-- फुले विकणारा माळी,

-- बेल आणणारा मजूर,

-- बेल विकणारा गुरव,

-- नारळ, प्रसाद विकणारा दुकानदार,

-- हॉटेल चालक,

-- स्टेशनवरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षा चालक,

-- मंदिर बांधणारे ईंजिनिअर, गवंडी, मजुर,


हे सर्वजण काही भटजी नसतात पण या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो.


म्हणून सांगतो, या सर्वात देवत्व शोधणारा माणूस आहे मी.


दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी.


दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी.

"पूजा करा... पूजा..." म्हणत भटजीही फिरत नाही घरोघरी.

अभिषेक करताना देतो ज्ञानाचीच शिदोरी.


कशी?


-तो सूर्याला देवता मानतो,

-तो पाण्याला देवता मानतो,

-तो भूमिला देवता मानतो,

-तो अग्नीला देवता मानतो,

-तो वायूला देवता मानतो,


अभिषेक म्हणजे काय करतो?

पंचभूताना देवता मानतो, पर्यावरणाचे स्मरण करतो.


पंचप्राणालाच देव मानणारा आहे मी.

निसर्गात देवत्व जाणणारा आस्तिक आहे मी.


अंधश्रद्धेला थारा नाही, श्रद्धाच जपतो मी.


जादूटोणा, चमत्कार, बुवाबाजीला फटकारतो मी.

दगडाच्या देवापुढे झुकणारा आस्तिक आहे मी.


तो दगडाचा देव वसतो नदीच्या किनारी, सागराच्या तीरावर, गिरी पर्वतावर अथवा खोल दरीत.


अशा स्थळी भेट देणारा निसर्ग प्रेमी आहे मी.

दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी.


निंरतर अंधश्रद्धा हा शब्द केवळ धार्मिक बाबतीतच लावला.

हे त्यांचे स्वार्थ म्हणावा का अज्ञान?

कोणीही उठायाच आणि आध्यात्मिक, धार्मिक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणावे.

हे सर्व काय आपल्या भारतीय संतापेक्षा ग्रेट आहेत का?


नाही... मुळीच नाही.


स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेणारे लोकच अंधश्रद्धेला बळी पडले आहेत.


विज्ञानाचा आधार घ्यावा पण अध्यात्माला नांवे ठेऊन नव्हे.

विज्ञान अध्यात्माचा बोट धरून चालले आहे.


प्रथम श्रद्धा म्हणजे काय?

श्रद्धा म्हणेचच विश्वास.

Tuesday, 18 May 2021

*हमारा भी एक 'जमाना' था .....*



पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची लेखणी जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.


अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक *चावून* झेललं होतं...


पास / नापास हेच आम्हाला  कळत होतं... % चा आमचा संबंध कधीच नव्हता.


शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण  "ढ" असं हीणवलं जायचं...


पुस्तकामध्ये *झाडाची पानं* आणि *मोरपिस* ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा *दृढ* विश्वास होता...


कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा *शिरस्ता* हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं...


दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक *वार्षिक उत्सव* असायचा...


आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी *फिकीर* नव्हती आणि ना ही आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा *बोजा* होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या *शाळेकडे* वळत नव्हती...


एका मित्राला सायकलच्या पुढच्या *दांड्यावर* व दुसऱ्याला मागच्या *carrier* वर बसवून, आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही... बस्सं!......काही *धूसर* आठवणी उरल्यात इतकंच.......!!


शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा *'ईगो'* कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला *'ईगो'* काय असतो हेच माहीत नव्हतं...


मार खाणं, ही आमच्या *दैनंदिन* जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. *मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे.* मार खाणारा यासाठी की, 'चला, कालच्यापेक्षा तरी आज कमी *धोपटला* गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा *हात धुवून* घ्यायला मिळाले म्हणून......


आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही *तुमच्यावर किती प्रेम करतो,* कारण आम्हाला *'आय लव यू'* म्हणणं माहीतच नव्हतं...


आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत *दुनियेचा एक हिस्सा झालोय.* काहींना जे हवं होतं, ते त्यांनी *मिळवलंय* तर काही 'काय माहीत....? कुठे हरवलेत ते...!


आम्ही जगात कुठेही असू पण हे *सत्य* आहे की, आम्ही *वास्तव दुनियेत जगलो,* आणि *वास्तवात* वाढलो.


कपड्यांना *सुरकुत्या* पडू न देणं आणि नात्यांमध्ये *औपचारिकता जपणं* आम्हाला कधी जमलंच नाही. त्या बाबतीत आम्ही *मूर्खच* राहिलो.


आपल्या *नशिबाला* कबूल करून आम्ही आजही *स्वप्नं* पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला *जगायला मदत करतायत* नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची *वर्तमानाशी* काहीच तुलना होणार नाही.


आम्ही चांगले असू किंवा वाईट, 


पण


*हमारा भी एक 'जमाना' था*......


*********     Whatsaap Collection     *********


Tuesday, 4 May 2021

कोरोनमुक्त झालेल्यांना लसीचा एकच डोज पुरेसा.

                  १७ एप्रिल ला प्रकाशित झालेल्यांना संशोधनावर जगात चर्चा सुरु झाली असून हि बातमी भारतासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. समोरच्या येणाऱ्या काळामध्ये एकच डोज पुरेसा होऊ शकतो का? हे पाहणे महत्वाचे आहे. डॉ. अरविंद देशमुख, मायक्रोबायॉलॉजिस्ट यांचे मते कोरोनाची लागण होऊन जे बरे झालेले आहेत. त्याच्या शरीरात बऱ्यापैकी अँटीबॉडीज तयार झालेल्या असून त्यांना दुसऱ्या लसीची आवश्यकता नाही. 

                       बघा युट्युब वरील त्यांचा हा व्हिडिओ  (ABP MAZA )

व्हिडीओ बघण्यासाठी समोर क्लीक करा. - Clik Here 

*कोविड वैक्सीन लगवाने वाले कृपया ध्यान दे!!!!*

 सावधान

कोविड वैक्सीन लगवाने वाले कृपया ध्यान दे!!!!

कल  अशोकनगर में  एक  आदमी  कोविड वैक्सीन लगवा कर जब घर आ रहे थे तो उनको धुँधला दिखाई देने लगा। घर पहुचते पहुचते वह अत्यधिक घबरा गए और तुरंत वैक्सीन सेंटर पर फोन करके अपनी परेशानी के बारे में बताया। 

वैक्सीन सेंटर से कहा गया कि आप तुरंत वापस आइये। क्योंकि आपके जाते ही आपको वैक्सीन लगाने वाली नर्स को भी धुधला दिखना शुरू हो गया है।  वह वापस वैक्सीन सेंटर पहुंचे तो डॉ ने उन्हें चश्मा देते हुए कहा कि यह अपना चश्मा लीजिये और नर्स का चश्मा जो आप पहन कर चले गए थे वापस कीजिये। 


हँसते रहें मुस्कुराते रहें और ज़्यादा दिमाग न लगाए

, वैक्सीन ज़रूर लगवाए 🙏