*पद*
कोणत्याही माणसाचे महत्व *पद* मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही, तो किती कार्यक्षम, कर्तृत्व,नेतृत्व दाखवतो... यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते, कर्तृत्वच नसेल आणि *पद* मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा,लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो.
*पदामुळे* तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते.
*पदामुळे* आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे,ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे,
*पद* कधी तरी जाणारच असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे असे माणसांशी वागले पाहिजे
नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता,कर्तृत्व,वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो,ऐकत असतो आणि सहनही करत असताे,मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते.
*म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी, नीट वागा,नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे काम करून सिध्द करा, तरच लोक तुमच्या सोबत राहतील...!*
*संघटना व संघटित कार्यकर्ते यांना समर्पित*
*रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असतं...
*🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻*
व्हाटसॅप कलेक्शन.........
No comments:
Post a Comment