Thursday, 29 April 2021

कोरोना.

 डॉ.सुधीर क्षीरसागर        9822094196

 एम.बी.बी.एस.(पुणे), डी.ए.(औरंगाबाद)

 रजी.नं 58329

            

घाबरू नका..


प्रत्येक ताप सर्दी खोकला हा कोरोना नसतो..


कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येवू शकते..


कोरोना ..९९% बरा होतो.


कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी हा औषधौपचार कमीत कमी पाच दिवस नक्की घ्या.


संशयित कोरोनाचा उपचार घरीच करा..


ताप-/अंगदुखी

Tab Calpol 500 

(स...दु...सं.)


सर्दी-

Tab Triz/Tab Levocet m 

(स‌‌....संध्याकाळ)


खोकला-

Tab Azee 500 

(रोज 1)  आणि

Sy.Grilinctus BM 10 मिली.

(स--- दु--- सं)


जुलाब..

Tab O2        

(स....सं)  आणि

Tab Ocid 20 

(स....सं) 

ORS Powder.

दिवसभर हवे तितके


उलटी मळमळ

Tab.Acilok RD 

      +स...संध्या)..

         किंवा

Tab Emcet 4mg 

जेवणापुर्वी एक ते दोन तास

सर्वांनी पाणी,पातळ पदार्थ भरपुर घ्या

------------------------- ०

खालील औषधे आजारी नसले तरी घ्या

Tab Limcee रोज १  (Vit C) 

लिंबू, संत्री

Tab Arovit.  रोज १ (Vit  A) 

गाजर, शेवगा

Tab Evoion रोज:१. (Vit E)

बदाम, शेंगदाणे


लहान मुलांच्या औषधौपचाराचे प्रमाणा साठी 

फोन करा...विनामुल्य सेवा

------------------------- ०

आपली नियमित चालू असलेली औषधे बंद करू नका !

---० आहारात 'क' जीवनसत्वयुक्त

---० पदार्थ भरपुर घ्या..

---० नियमित.. पौष्टिक अन्न !

---० नियमित..सलाग व्यायाम !

       (चालणे सर्वात उत्तम)

---० नियमित..पुरेशी झोप !

---० नियमित..आनंदी रहा !

---० नियमित..हसत रहा !

------------------------- ०

 उगीचच मोठ्या हॉस्पीटल्स,  मध्ये अॕडमिट होऊन खिशाला कात्री लावून नका...

------------------------ ०

लक्षात ठेवा...

कोणाकडे ही *जादूची कांडी नाही..

छोट्या आणि मोठ्या रुग्णालयांत एकाच प्रकारचा आणि सारखाच औषधौपचार केला जातो...

कोरोना टेस्ट कधीही आणि वारंवार सुध्दा पॉझिटिव्ह येवू शकते. 

------------------------- ०

लक्षात घ्या..

आजपर्यंत एकही नेता,अभिनेता, उद्योगपती, क्रिकेटपटू  किंवा व्ही.आय.पी. कोरोनाने मृत्यूमुखी पडला नाही...*

याचे कारण त्यांनी *मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज केला म्हणून नाही तर "कोरोना" हा सौम्य आजार आहे म्हणून ते बरे झाले आहेत!


तुमच्या अज्ञानाचा आणि घाबरलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेवून तुम्हाला लुटले जाऊ शकते..


तेव्हा सावध व्हा!


१)डॉ‌.निलेश पाटील

२)डॉ.पल्लवी पाटील

३)डॉ.संग्राम पाटील.

४)श्री.संदिप माहेश्वरी 

यांच्या कोरोना सबंधित पोस्ट नक्की पहा..ऐका!

पाच दिवसांनंतर..बरे वाटले नाही किंवा खालील त्रास वाढला तरच..


जास्त ताप..

श्वासोश्वासास भयंकर त्रास होत असल्यास,

दम खुपच लागत असल्यास..

प्रचंड खोकला येत असल्यास..


इतर छातीचे आजार नसल्याची खात्री करणे ताप येणारे आजार नसल्याची खात्री करणे

नंतरच सरकारी दवाखान्याची संपर्क करा...

                  

नियमित..माणूसकी जपा! 

आपल्या सर्वांना आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक मंगलमय शुभेच्छा...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आपलाच मित्र,

डॉ.सुधीर क्षीरसागर


कृपया ही पोस्ट आपली मित्र-मंडळी, स्नेही, परिवार आणि हितशत्रू यांना सुध्दा शेअर करा...

************

 कोरोना झाल्यावर काय कराल ?


सर्व प्रथम जाणून घ्या जर सर्दी झाली असेल आणि तुमचा mucous (शेम्बूड) पांढरा वाहत असेल तर अजून काही विपरीत परिणाम नाहीये.


जर mucous चा रंग पिवळा किंवा हिरवा असेल तर तुम्हाला अँटिबायोटिक्स ची नितांत गरज आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही टेस्टिंग ला गेलात तर १००% तुमची टेस्ट POSITIVE येणार.


RTPCR टेस्टचा निकाल दोन दिवसांनी मिळतो आणि RTPCR टेस्टचा निकाल  तुम्ही जलद सुद्धा करू शकता त्यानुसार तुम्हाला त्वरित कळेल की तुम्ही POSITIVE आहात की NEGATIVE आहात. 


जर तुम्ही POSITIVE झाले असाल तर सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की तुम्ही जगातील सर्वात " फुसक्या "आजाराला बळी पडला आहात.  ह्याचा इलाज जर तुम्ही सरकारी दवाखान्यातून केला तर तुम्ही विनाखर्च १००% बरे होणार आहात. 


आपल्याकडे पैशांची कमतरता नाही, म्हणून या फुसक्या आजारावरील इलाजासाठी जर आपण  खाजगी रुग्णालयात गेलात तर मात्र तुमची खैर नाही. ह्याचे कारण पुढीलप्रमाणे -


(०१) 

खाजगी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला सर्दी व ताप नियंत्रणात आणण्यासाठी गोळ्या औषधे आणि सलाईन दिले जातील. 


(०२)

सरकारी रिपोर्ट वर भरोसा नाही म्हणून पुन्हा RTPCR करण्यास भाग पाडतील त्यामुळे दोन दिवसांचे बेड चार्जेस वाढतीलच शिवाय RTPCR  रिपोर्टसाठी रुपये ८०० द्यावे लागतील . 


(०३)

रिपोर्ट प्राप्त झाल्यावर RTPCR चिकित्सेनुसार स्कोर जास्त आसल्याचे आपणास सांगून,  विषाणू किती खोलवर गेला हे समजण्यासाठी HTRSCAN टेस्ट करवून घेण्याचा निर्णय घेण्यात येईला व त्यासाठी येणारा कमीत कमी खर्च म्हणजे HTRSCAN टेस्टसाठी  रुपये २५०० आणि ऍम्ब्युलन्स किमान खर्च रुपये १०००/- ते ३०००/-.


(०४)

या चिकित्सेनंतरच तुमच्यावर  इलाज सूरू करण्यात  येतील. सर्दी नियंत्रणासाठी कांही गोळ्या देण्यात येतील, तापासाठी काही वेळ्या गोळ्या देण्यात येतील, सांधे दुखत असल्यास व्हिटॅमिन डी३ च्या गोळ्या देण्यात येतील आणि चव आणि वास गेला असल्यास व्हिटॅमिन "क" च्या गोळ्या देण्यात येतील.  वैध्यक शास्त्रानुसार याला उपचार समजले जात नाही.


(०५)

कांही दिवसानंतर  तुम्हाला FABIFLUE 800 MG च्या गोळ्यांचा कोर्स चालू करण्यात येईल.    ह्या FORTE प्रकारातील गोळ्यांची किंमत रूपये २५६० रुपये. एवढ्या महाग गोळ्या घेतल्यामुळे "कोरोना " या आजाराच्या भयानक तिव्रतेबाबत  तुमची मानसीक खात्री होईलच आणि या १५ दिवसांच्या उपचारानंतर तुम्हाला घरी पाठविण्यात  येते. या पंधरा दिवासांत तूमच्या खिशांतून राजरोसपणे किमान रुपये ३,००,००० लुटण्यात येतात. 


(०६)

किमान पंधरा दिवस वैध्यकिय सल्यानुसार  नियमितपणे FABIFLUE 800 MG  पॉवरच्या गोळ्या तुम्ही शरीरात ढकलत असल्यामुळे, आपल्या एक गोष्ट लक्षात  येत नाही की भविष्यांत ह्याचा काही विपरीत परिणाम आपल्या शरीरावार होणार आहे का ?. झालाच तर तो आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर होईन हे भविष्यात कळेलच. 


(०७)

कोरोना वैध्यकिय उपचारांमुळे तुम्ही भावनिक होऊन डॉक्टरला हाथ जोडाल आणि तुम्हाला वाटेल त्यांच्या प्रयत्नामुळेच तुम्हाला जीवदान मिळाले. परंतु असे काही नाही त्याने पक्के तुम्हाला वेड्यात काढून तुमचे खिसे रिकामे केलेले असतील. 


मित्रांनो, सांगायची गम्मत अशी की ज्या FORTE प्रकारातील गोळ्या ही धुरंदर मंडळी तुम्हाला देत आहे त्याचा निर्माता आहे GLENPHARMA कंपनी. या औषधी गोळ्यां शरीरातील INFECTION दूर करण्या करिता ह्या गोळ्या बनविलेल्या आहेत बाकी काही नाही.


आपण जे म्हणतो की कोरोना वर इलाज नाही त्यावर हा उपाय एकदम बरोबर बसत आहे. त्यामुळे लोक बरे होत आहे.  


आपल्या हातात १० ते २० हजार रुपये किमतीचा महागडा फोन असून देखील आपण GOOGLE वर काही खात्री करून घेत नाही, ही सर्वात मोठी तुमची चूक म्हणावी लागेल. 


सरकारी दवाखान्यात ह्या महागड्या गोळ्या अजिबात दिल्या जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा HTRSCAN ही काढण्यास सांगण्यात येत नाही.


सरकारी  दिल्या जातात त्या फक्त DOXY 1 - LDR च्या गोळ्या. या औषधी गोळ्या जर आपण स्वत: बाहेरून खरेदी केल्यात तर ह्याचे अवघे पाकीट ९५ रुपयांना मिळते आणि रोजच्या जेवणानंतर दोन गोळ्या अशा प्रकारे नियमितपणे पाच दिवस गोळ्या घेतल्यास तुमचा कोरोना कुठाल्या कुठे निघून जातो हे  कळत देखील नाही. आणि तुम्ही अगदी ठणठणीत होऊन  फिरण्यास मोकळे.


आता तुम्ही ठरवा खाजगी इलाज ३,००,०००/- रुपयांचा की सरकारी  रू. ९५/- चा इलाज ?   


[ टिप - दोन्ही गोळ्यांच्या संदर्भात तुम्ही GOOGLE वर माहिती जाणून घेऊ शकता. ]



************* Whatsaap Collection *************

पॉजिटीव्ह बातमी.

           साधारण १० दिवसांपूर्वी माझ्या परिचयातले एक कुटुंब करोना पॉजिटीव्ह झाले. त्यात पहिला व्हॅक्सीनचा डोज घेतलेले दोन सिनियर सिटीझन आणि दोन चाळिशीतील 'तरुण' होते. त्यांच्या टेस्ट्स १६ तारखेला झाल्या व टेस्ट्सचे रिपोर्ट्स १८ तारखेला आले होते. चौघांनाही ताप होता आणि त्यातील एकाला श्वास घ्यायला अधून-मधून त्रास होत होता. हे सगळं होत असताना टीव्हीवर बातम्यांमधून बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही, औषधं नाहीत, रक्त नाही, आयसीयू मध्ये होरपळून लोकं मरत आहेत, लॉकडाऊन होणार, लाखोंच्या संख्येत रेकॉर्ड आकडे, स्मशानाची चिमणी जळली, स्मशानभूमीतील जळते सरण विझेना, सामूहिक अंतिम संस्कार वगैरे बातम्या दिवस-रात्र सुरू होत्या. त्याने ही लोकं अजून खचून गेली होती. त्यात, जवळच्या तीन-चार हॉस्पिटलमध्ये कॉल केले तर त्यांना बेड्स नाहीत असं सांगण्यात आलं होतं. तेंव्हा माझं या सर्वांशी बोलणं झालं. 'सगळं संपलंय' हेच यांना वाटत होतं. धीर देणं हे माझं काम होतं, मी ते काम जमेल तेवढं केलं. पण, तेवढ्याने काही होणार नव्हतं. त्यांना मदतीची गरज होती. पण, 'मी स्वतः येतो आणि मदत करतो' म्हणायला मी काही सुपरमॅन नाही! माझा हेतू चांगला आणि माझी मदत करायची इच्छा असली तरीही ते त्या करोनाला कुठं कळणार होतं? अहो मलाही माझा जीव प्यारा आहेच की..


          मग डोकं लावलं. प्रत्येक शहरात well-furnished फ्लॅट्स विकणारे बिल्डर आहेत. फ्लॅट्स मध्ये सगळ्या सुख-सोयी असतात, तिकडे कोणी राहायला आलेलं नसतं आणि फक्त अंगावरच्या कपड्यावर थेट अशा फ्लॅट्स मध्ये माणूस राहायला जाऊ शकतो. सध्या असे हजारो फ्लॅट्स पडून आहेत बिल्डरांकडे. मग, माझ्या ओळखीच्या एका बिल्डरला फोन केला. त्याला सांगितलं की दोन well-furnished आणि well-ventilated फ्लॅट्स( 2BHK) सात दिवसांसाठी हवेत. किरकोळ लक्षणं असलेले 4 पेशंट्स आहेत, तिकडे आयसोलेशन मध्ये राहतील आणि कुठेही बाहेर पडणार नाहीत. गरज पडतील ती सर्व औषधं आणि जेवण बाहेरून पुरवलं जाईल आणि त्यातील कोणीही इमर्जन्सी नसेल तर घराबाहेर पडणार नाही याची गॅरंटी दिली. बिल्डरने साधारण 'होम-स्टे' च्या किंमतीत फ्लॅट्स दिले. तसाही त्यांचा पण धंदा ठप्प आहे..


          डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी औषधे घेतली - फक्त एक अँटी-बायोटिक्सचा कोर्स, ताप येईल तेंव्हा डोलो, प्रोन पोजिशन मध्ये दिवसातून 4 वेळा झोपणे, भरपूर पाणी पिणे, लिंबू-पाणी, बिकोझिंक (2 रुपये प्रति टॅबलेट दिवसातून एकदा), फ्लॅट मध्ये फ्रेश खेळती हवा आणि जास्तीतजास्त आराम. आज सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. आज त्यांचं घर सॅनिटाईज करायच्या सर्व्हिसेस देणारी एक टीम येऊन पूर्ण घर सॅनिटाईज करणार आहे आणि उद्या सगळे घरी जातील. याकाळात व्हॅक्सीन घेतलेल्या दोन्ही सिनियर सिटीझनना अजिबात त्रास झाला नाही हे विशेष. पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी अजून चार दिवसांनी पुन्हा एकदा सगळे टेस्ट करतील, पण आता त्यांच्या मनात कसलीही भीती नाही. यातच त्यांचा विजय आहे!


          तात्पर्य हे की हॉस्पिटल, ऑक्सिजन, महागडी औषधे, त्रास आणि चिंता काहीही न करता चौघेही बरे झालेत. यात फक्त एकच महत्वाची गोष्ट ही होती की एकाला लक्षणं दिसताच त्यांनी सगळ्यांच्या ताबडतोब टेस्ट केल्या. संपूर्ण आजारपणात चौघांचा एकूण खर्च 35-40000 पण नाही झाला. त्यात ते हा सगळा काळ अतिशय प्रसन्न वातावरणात होते आणि आजूबाजूला कुठलीही निगेटिव्हीटी नव्हती..


          अजिबात काळजी करू नका, लाखो लोकं बरी होत आहेत. संधी मिळताच ताबडतोब व्हॅक्सीन घ्या आणि लक्षणं दिसताच टेस्ट करा. टेस्ट करायला तर बिलकुल घाबरू नका. लवकर निदान झाले तर तुमचे डॉक्टर तुम्हाला घरबसल्या बरं करतील. The key is EARY DIAGNOSIS! आणि करोना पॉजिटीव्ह आहात सांगितलं की तुम्ही निगेटिव्ह होऊ नका, तुम्ही पण पॉजिटीव्ह रहा. तुम्ही पॉजिटीव्ह रहाल तर करोना निगेटिव्ह होणार..


- वेद कुमार.


काल अजून 4 जणांच्या एका फॅमिलीची अशीच व्यवस्था केली आहे. त्यांनी मराठी बातम्या बघायच्या सोडून दिलेत. सगळे मस्त आहेत..



-------------  Whatsaap Collection  -------------


Third phase of vaccination on the 1st of May 2021.

 India begins it's third phase of vaccination on the 1st of May 2021. 

Here is a thread to help you with the process. 


1. At present there are two vaccines available in India Covishield manufactured by the Serum Institute of India and Covaxin by Bharat Bio-Tech


2. The dosing interval for Covishield is 6-8 weeks while the dosing interval for Covaxin  is 4-6 weeks. 


3. If you have tested positive or are showing symptoms you should NOT take the vaccine and defer your jab by atleast 4 weeks from the day your symptoms resolve.


4. If you have taken the first dose and test positive or are showing symptoms before the second dose defer the second jab by atleast 4 weeks (even if it defies the preset interval limit of 4-8week)


5. If you are pregnant/lactating,  The International Federation of Obstetrics and Gynaecology vide their letter on the 2nd of March 2021 advices that the patient  can take both the doses of the vaccine in consultation with her treating obstetrician after explaining all the risks and  benifit but at present the  MoHFW_INDIA advices not to take the vaccine.


6. Can you get infected even after taking both the doses of the vaccine? - Yes! BUT the recently published data by ICMR DELHI shows the chances of acquiring the infection is 0.03% after both the doses of Covishield and 0.04% after both the doses of Covaxin and even among those who go on to develop the infection, the severity of disease/risk of hospital admission and death is next to 0


7. Possible side effects ? - Pain at the vaccination site/fever for 24-72 hours and YES you can take a PCM for the same.


8. Blood clots after Covishield ? It has a name!  TTS (Thrombotic thrombocytopenia syndrome) - it is very very rare (1 in 2,50,000 participants in the UK where the study was done)  side effect which should absolutely not be a concern. (Benefits far outweigh risks)


9. Can you get COVID from the vaccine ? - No, ABSOLUTELY NOT!

Age group 18 Yrs and above can be Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.

 Age group 18 Yrs and above can be  Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.

पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇

Login site is

www.cowin.gov.in

*Google वर जाऊन

cowin.gov.in टाईप करा.

*Register/ Sign in yourself 

मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

* OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा.

*Vaccine Registraction form भरा.क्लिक करा

* तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल

* schedule appointment वर क्लिक करा. नंतर

*पिन कोड टाका (उदा.445302)

*Sessaton निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.

*Vaccin center व Date निवडा.

*Appointment book करुन ती coform करा.

*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

*त्यमुळे vaccination center वर  vaccine देणे सोपे होईल.

 टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.

मायकल जॅक्सन आणि मृत्यू .....

 मृत्यू - एक अटळ सत्य.....


मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं. 


          कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे. 


          त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत. 


          त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. 


         त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे. 


          मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर. 


          दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील. 


          त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही. 


          त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 


         जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections घ्यावी लागत असे. 


          मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे. 


          मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं. 


          मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच खरं. 


          चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज.. कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच नाही.

          म्हणूनच सिकंदरन सांगितले  होते, मी  मरताना माझे  दोन्ही  हात  मोकळे ठेवा, जगाला  दिसावेत मी रिकाम्या हाताने जात  आहे. हेच  जीवनाचे  सत्य  आहे. 


     आनंदात रहा, दुसर्‍याला पण आनंद वाटा आणि आनंदाने जगू  द्या.

..........निस्वार्थी मदत.........

 मुर्खपणा


          माझ्या मुलीचे लग्न होते आणि मी काही दिवस सुट्टी घेऊन लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो. त्या दिवशी प्रवासातून घरी आलो तर पत्नी ने माझ्या हाती एक पाकीट दिलं. पाकीट अनोळखी होतं पण पाठविणाऱ्याचे नाव पाहून मला आश्चर्यमिश्रित उत्सुकता लागली. ‘अमर विश्वास’, एक असे नाव, ज्याला भेटून काही वर्षे उलटली होती. मी पाकीट उघडले तर त्यात एक लाख डाॅलर चा चेक आणि एक पत्र होतं. इतकी मोठी रक्कम, ती ही माझ्या नावावर? मी घाईत पत्र उघडले आणि एका दमात पुर्ण वाचून काढले. पत्र एखाद्या परी कथेसारखं मला अचंभित करुन गेले. लिहिले होते :


          'आदरणीय सर, मी एक छोटीशी भेंट आपल्याला देत आहे. आपल्या उपकारांचे ओझे मी कधी उतारू शकेल असे मला वाटत नाही. ही भेट मी माझ्या न बघीतलेल्या बहिणीसाठी आहे. घरी सर्वांना माझा नमस्कार.

आपला,

अमर.


          माझ्या डोळ्यांसमोर खुप वर्षांपुर्वीच्या घटना एकाद्या चित्रपटासारख्या सरकू लागल्या. एक दिवस मी गावात फिरत एका पुस्तकांच्या दुकानात आपली आवडती मासिकं चाळत होतो. माझे लक्ष बाहेर पुस्तकांच्या एका छोट्या ढिगाऱ्याजवळ उभ्या असलेल्या मुलावर पडली. तो पुस्तकांच्या दुकानात घुसणाऱ्या प्रत्त्येक व्यक्तिला काही विनंती करत होता व काही प्रतिसाद न मिळाल्यावर परत आपल्या जागी जाऊन उभा रहात होता.

          मी बराच वेळ मुकाट्याने हे दृश्य बघत राहिलो. पहिल्या नजरेत हे फुटपाथवर दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांसारखे वाटत होते, परंतु त्या मुलाच्या चेहऱ्यावरची निराशा सामान्य वाटत नव्हती. प्रत्त्येक वेळी तो नव्याने प्रयत्न करायचा, परत तीच निराशा. बऱ्याच वेळ त्याला बघीतल्यावर मी आपली उत्सुकता थांबवू शकलो नाही आणि त्या मुलाजवळ जाऊन उभा राहिलो. तो मुलगा काही साधी विज्ञानाची पुस्तकें विकत होता. मला बघून त्याच्यात परत आशा संचारली आणि उत्साहाने त्याने मला पुस्तकं दाखवायला सुरुवात केली. मी त्या मुलाला लक्षपूर्वक बघीतले. स्वच्छ, चेहऱ्यावर आत्मविश्वास पण कपडे अगदीच साधारण. थंडीचे दिवस होते व तो केवळ एक हलकेसे स्वेटर घातलेला होता. पुस्तकं माझ्या काहीच कामाची नव्हती तरी मी जसे काही सम्मोहीत होऊन त्याला विचारले... 

          ‘बेटा, ही सारी पुस्तकं केवढ्याची आहेत?’

          ‘तुम्ही किती देऊ शकता, सर?’

          ‘अरे, तु काही तरी किंमत ठरवली असशीलच ना.’

          ‘आपण जे द्याल ते,’ मुलगा थोडा निराश होऊन बोलला.

          ‘तुला किती पाहिजेत?’ तो मुलगा समजून चुकला की मला काही पुस्तकं घ्यायची नाहीत व मी त्याच्यासोबत टाईम पास करीत आहे.

          ‘पाच हजार रुपये,’ तो मुलगा वाकडं तोंड करून बोलला.

          ‘या पुस्तकांचे कोणीही पाचशे पण दिले तरी जास्त होतील,’ मला त्याला दुःखी करायचे नव्हते तरी माझ्या तोंडून सहज निघून गेले.

          आता त्या मुलाचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता. जशी की कुणी खूप सारी उदासी त्याच्या चेहऱ्यावर ओतून दिली आहे. मला माझ्या बोलण्याचा खुप पश्र्चाताप झाला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला धीर देत विचारले, ‘बघ बाळ, मला तु पुस्तके विकणारा वाटत नाहीस, काय कारण आहे. स्पष्ट सांग की तुझी काय गरज आहे?’

          त्या मुलाच्या मनाचा धीर सुटला. बहुतेक बऱ्याच वेळचा नैराश्याचा चढ-उतार आता त्याच्या सहनशिलतेच्या पलीकडे गेला होता.

          ‘सर, माझी बारावी झालेली आहे. माझे वडील एका छोट्या हाॅटेलात काम करतात. माझी वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेली आहे. आता मला प्रवेश घेण्यासाठी पैशाची गरज आहे. माझे वडील काही पैसे देण्यास तयार आहेत, बाकी अजून पैशांची व्यवस्था करणे त्यांना शक्य नाही.' मुलाने एका दमात इंग्रजीत हे सर्व सांगितले.

          ‘तुझे नाव काय आहे ?’ मी मंत्रमुग्ध होऊन विचारले.

          ‘अमर विश्वास.’

          ‘तु विश्वास आहेस आणि मन छोटं करतोस? किती पैसे पाहिजेत?’

          ‘पाच हजार,’ या वेळी त्याच्या स्वरात करुणा होती.

          ‘जर मी हे पैसे तुला दिलेत तर परत करू शकशील का? या पुस्तकाची तर इतकी किंमत नाही,’ या वेळी मी थोडं हसून विचारले.

          ‘सर, तुम्हीच तर म्हणालात की मी विश्वास आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास करू शकता. मी गेल्या चार दिवसांपासून येथे येत आहे, तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात ज्याने एवढे तरी विचारले. जर पैशांची व्यवस्था होऊ नाही शकली तर मी ही आपल्याला एखाद्या हाॅटेलात कप-बशा धूतांना दिसेल,’ त्याच्या स्वरात आपले भविष्य बुडण्याची शंका होती.

          त्याच्या स्वरात असे काय होते माहीत नाही, जे माझ्या अंतःकरणात त्याला मदत करण्याची भावना उपजू लागली. मेंदू त्याला एक धोकेबाज पेक्षा जास्त काही मानण्यास तयार नव्हता, परंतू हृदय हा विचार स्विकारत नव्हते.

          शेवटी हृदय जिंकले. मी पर्स मधून पाच हजार रूपये काढले, ज्यांना मी शेयर मार्केट मध्ये लावण्याचा विचार करीत होतो, त्याच्या हातात दिले. तसे एवढे रूपये माझ्यासाठी ही महत्त्वाचे होते, परंतू न जाने कोणत्या मोहाने माझ्याकडून ते पैसे काढून घेतले.

          ‘बघ बाळा, तुझ्या बोलण्यात, तुझ्या इच्छाशक्ती मध्ये किती दम आहे हे मला माहीत नाही, परंतू माझे मन म्हणते की तुला मदत केली पाहिजे, त्यामुळे करतो आहे. तुझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान मुलगी मिनी आहे मला. तिला काही खेळणं घेऊन दिले असे समजेल,’ मी अमर कडे पैसे देत म्हणालो.

          अमर स्तब्ध होता. त्याला बहुतेक विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने माझ्या पायांना स्पर्श केला तर त्याच्या डोळ्यातून निघालेल्या दोन थेंबांनी पायांचे चुंबन घेतले.

         ‘ही पुस्तकं मी तुमच्या गाडीत ठेवून देवू ?’

          ‘काही गरज नाही. यांना तु तुझ्या जवळच ठेव. हे माझे कार्ड आहे, केव्हाही कधी गरज पडली तर मला सांग.’

          तो पुतळ्यासारखा उभा होता. मी त्याच्या खांद्यावर थोपटले, कार चालू करून निघालो.


          ती घटना माझ्या डोळ्यांसमोर फिरत होती आणि मी खेळलेल्या जुगारा विषयी विचार करत होतो, ज्यात अनिश्चितताच ज्यास्त होती. कोनी दूसरा ऐकेल तर मला एक "भावुक मूर्ख व्यक्ती'' पेक्षा जास्त समजला नसता. म्हणून ही घटना कुणाला न सांगण्याचा मी निर्णय घेतला. दिवस पुढे सरकत गेले. अमर ने आपल्या मेडिकल मधील प्रवेशाची माहीती पत्र पाठवून दिली होतीच. मला आपल्या मुर्खपणात माणूसकी दिसली. एक गुप्त शक्ति किंवा माझ्यात बसलेल्या माणसाने मला प्रेरित केले की मी हजार दोन हजार रुपये त्याच्या पत्त्यावर पुन्हा पाठवून देऊ. भावना जिंकल्या आणि मी पुन्हा आपला मुर्खपणा गिरवला. दिवस पुढे सरकत गेले. त्याचे संक्षिप्त पत्र यायचे ज्यात चार ओळी लिहिलेल्या असायच्या. दोन माझ्यासाठी, एक आपल्या अभ्यासाविषयी, आणि एक मिनी साठी, जिला तो आपली बहीन म्हणत होता. मी आपली मुर्खता गिरवायचो व विसरून जायचो. मी कधी त्याच्याकडे जाऊन आपल्या पैशांचा विनियोग बरोबर होतोय का हे बघण्याचा प्रयत्न ही केला नाही, तो ही कधी माझ्या घरी आला नाही.


          काही वर्षांपर्यंत हा दिनक्रम चालू राहिला. एक दिवस त्याचे पत्र आले की तो उच्च शिक्षणासाठी आॅस्ट्रेलिया ला जात आहे. शिष्यवृत्तीं विषयी ही लिहिले होते व एक ओळ मिनी साठी पण लिहायला तो विसरला नव्हता. मला आपल्या माझ्या मचर्खपणा वर दुसऱ्यांदा गर्व झाला, त्या पत्राचा खरेपणा जाणून न घेता. दिवस पंख लागल्यासारखे उडत राहीले. अमर नी आपल्या लग्नाचे निमंत्रण पाठविले. तो बहुतेक आॅस्ट्रेलिया मध्येच स्थायीक होण्याच्या विचारात होता.

          मिनी चे ही शिक्षण पुर्ण झाले होते. एका प्रतिष्ठित परिवारात तिचे लग्न ठरले. आता मला मिनी चे लग्न मुलाच्या घराण्यास शोभेल असे करायचे होते. सरकारी नोकरीतला का एक मोठा अधिकारी कागदी सिंहच असतो. लग्नाच्या तयारी साठी खुपशा पैशांची व्यवस्था… डोक्यातील विचार… आणि आता तो चेक? मी परत आपल्या दुनियेत व वापस आलो. मनात परत अमर ची आठवण काढली आणि मिनी च्यख लग्नाची पत्रिका अमर ला ही पाठवून दिली.

          लग्नाची गडबड चालली होती. मी आणि माझी पत्नी तयारीत व्यस्त होतो आणि मिनी आपल्या मैत्रीणींमध्ये. एक मोठी गाडी दरवाज्यात येऊन थांबली. एका प्रतिष्ठित दिसणाऱ्या व्यक्तीसाठी ड्रायवर ने गाड़ी चे दार उघडले, तर त्या व्यक्ती च्या सोबत लहान मुलाला कडेवर घेऊन त्याची पत्नीही गाड़ीतून उतरली. मी आपल्या दरवाजा वर जाऊन उभा राहिलो तर त्या व्यक्तीला आधी कुठेतरी बघीतल्या सारखे वाटले. त्याने येऊन माझी पत्नी व माझ्या पाया पडला.

          ‘‘सर, मी अमर…’’ तो मोठ्या श्रद्धेने बोलला.


          माझी पत्नी आश्र्चर्य चकित होऊन उभी होती. मी मोठ्या अभिमानाने त्याला आलिंगन दिले. त्याचा मुलगा माझ्या पत्नीच्या कडेवर आरामात बसला होता. मिनी अजूनही संशयाने बघत होती. अमर खुप भेटवस्तू सोबत घेऊन आला होता. मिनीला त्याने मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. मिनी ला भाऊ मिळाल्याने ती खुप खुश होती. अमर लग्नात मोठ्या भावाच्या प्रत्त्येक परंपरा निभावण्यात व्यस्त होता. त्याने माझ्यावर कोणतीही मोठी जबाबदारी येऊ दिली नाही की मला एकही पैसा खर्च करु दिला नाही. त्याचे भारत प्रवासाचे दिवस पंख लागल्या सारखे उडून गेले. या वेळी जेव्हा अमर आॅस्ट्रेलिया ला परत चालला होता तेव्हा विमानतळावर त्याला निरोप देताना फक्त माझेच नाही तर माझी पत्नी, मिनी सर्वांचे डोळे पाणावले होते. विमान ऊंचच ऊंच आकाशाला स्पर्श करण्यासाठी निघाले आणि त्यासोबतच माझा विश्वासही आकाशाला स्पर्श करीत होता. मला आपल्या मुर्खपणावर परत एकदा गर्व झाला आणि विचार करीत होतो की या विनाशी सृष्टी ला चालवणारा कोणी भगवान नाहीं, आमचा विश्वासच आहे....आत्ता  आपल्या कडे कितीका पैसे असेनात पण आपल्या  अडचणीच्या वेळी आपल्याला  हात दिला..साथ दिली .. सावरले...ते विसरु नका... पैसे परत देता येतीलही पण ती वेळ परत देता येणार ....


           कुणालाही निस्वार्थी केलीली मदत  ही आपल्याकडे परत येते हाच निसर्ग नियम आहे.....‼️





-: वरील कथेतील सम्पूर्ण पात्रे हि काल्पनिक असून जर साम्य आढळल्यास तो फक्त योगायोग असेल. :-


------------------    Whatsaap Collection     ------------------

व्यक्तींच्या स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव!!!!!

          प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवायला हवी...... क्षमता आणि आकांक्षा यात खूप अंतर असल्यास व्यक्तीला अपेक्षाभंग... निराशा व मानसिक संघर्ष इत्यादी नकारात्मक भावनांना तोंड द्यावे लागते...... 


          त्यामुळे व्यक्तीला परिस्थितीनुसार स्वत:च्या ध्येय किंवा आकांक्षेची पातळी कमी जास्त करता यायला हवी..... दुराग्रहीवृत्ती व अट्टाहास मानवी जीवनात केवळ दु:ख व निराशा निर्माण करत नाही.... तर मानसिक संतुलनात अडथळे निर्माण करून पुढील जीवनात मानसिक आजारी बनवतात..... 


          जीवनात घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबरच हवा असा आग्रह करू नये..... कालांतराने यापैकी काही निर्णय चुकल्याची जाणीव होते..... पण आपल्या हाती आता करण्यासारखे काहीचे नसते...... अशावेळी त्याबद्दल खंत न करता केवळ आपला निर्णय योग्य नव्हता.... ही जाणीव ठेवल्यास आपण स्वत:ला किंवा इतरांना दोष देण्याची चूक करणार नाही व त्यामुळे आपले मानसिक संतुलन ढळणार नाही..... लक्षात ठेवा ..... जीवनातील कोणत्याही कार्यात अपयश हा अपरिहार्य भाग आहे..... 


          आपणास सर्वच क्षेत्रात यशस्वी व्हायला आपल्याला आवडते..... यशाचे अत्युच्च टोक गाठल्यानंतर कोणतीही व्यक्ती त्या स्थानावर नेहमीकरता राहू शकत नाही..... जीवनात येणाऱ्या अपयशांमुळे प्रयत्न करणे सोडणे हे देखील बरोबर नाही..... अपयशाचा उपयोग यश प्राप्तीकरता होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे..... 


          शेवटी काय तर .... आपली धडपड असते आपल्या आयुष्यातील सुखासाठी....आनंदात असण्यासाठी..... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल.... असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो..... खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही...... यश - अपयश येतच राहणार ..... आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच...... ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का..!

............... ...................

संग्रहित..... 


Wednesday, 28 April 2021

शिक्षकांचा पगार आणि कुतूहलाचा विषय !!!!!!!

 शिक्षकांचा पगार...


       हल्ली शिक्षकांचा पगार हा सर्वांसाठी कुतूहलाचा, तसाच ईर्षेचा विषय झाला आहे. अगदी गल्ली ते दिल्ली त्याची चर्चा आहे. 


     शासनाच्या वर्गवारीनुसार तो (क-वर्गात) आहे. (अ आणि ब वर्गांची) चर्चा होत नाही, मात्र (क-वर्ग) सर्वांना खुपतो.


त्याची कारणेही तशीच आहेत...


  १. लाखों सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांची संख्या जास्त आहे. 


  २. शिक्षकांचा सरळ संपर्क लोकांशी न येता त्यांच्या लहान मुलांशी येतो. 


   ३. शिक्षकांवाचून कुणाचं आडत नसल्याने त्याचे महत्त्व कमी झाले.

उलट ग्रामसेवक, तलाठी, पोलिस, इत्यादी, यांचा आदर होतो. 


     बस चालक व इतर हे सर्व लोकांसाठी साहेब असतात. 

शिक्षक मात्र मास्तर वगैरे...


     न्यायालयीन भाषेत शिक्षक हा नोकर नाही. 

     तरीही समाज त्याची अवहेलना करतो.


आणि सर्वात महत्वाचे म्हणजे

शिक्षकाच्या पेशात भ्रष्टाचारास वाव नाही.


वेळेचे बंधन त्यास कटाक्षाने पाळावे लागते.


    वर्गातील शेकडों कुटुंबातून आलेल्या विविविध जडणघडणीतल्या मुलांना समजून घेऊन योग्य वळण द्यावे लागते. 


बाहेर हा जो सुव्यवस्थीत जो समाज दिसतो, तो शिक्षणाचाच परिणाम आहे.


     एकीकडे शिक्षणाचे महत्त्व मान्य करायचे आणि त्या शिक्षणाचा कणा असलेला शिक्षक याचा उपमर्द करायचा ही कोणती मानसिकता...!


     उठसूट कुणीही शिक्षकांबद्दल बोलत आहे. शेकडों वर्षे शिक्षक साधेपणाने जगत होता तेव्हा महान होता परंतु त्याच्याकडे दोन पैसे दिसू लागले तर लोकांना पोटशूळ उठायला लागले. 


करोडोंचा भ्रष्टाचार करणारे नेते तुम्हाला चालतात. 

त्यांच्यापुढे शेपूट घालता. 

भ्रष्टाचार करून करोडोंची संपत्ती कमावणारे अधिकारी तुमच्यासाठी साहेब असतात, 

आणि 

तुमच्या चिमुकल्यांना आईच्या मायेने आणि बापाच्या धाकाने वळण लावणारे शिक्षक मात्र मास्तरडे...!


मुळात शिक्षक हा    डी.एड, ए.टी.डी,      ए.एम, बी.ए.बी.एड, बी.ए.स्सी.बी.एड, बी.ए.बी.पी.एड, एम.ए.बी.एड,वगैरे असतो...


आयुष्यातील पंचवीस वर्षे शिक्षण घेण्यात घालवलेले असतात. पुन्हा पाच-दहा वर्षे बिनपगारी, तरीही समाजाला शिक्षकाचा पगार दिसतो.


       दिवसभर एक मिनिट देखील उशीर न करता आपल्या वर्गावर जाऊन नजरेला नजर भिडवून शिकवणारा, घसा कोरडा होई पर्यंत बोलत राहणारा, सतत उभा राहून शिकवणारा शिक्षक काय इतका हीन आहे की कुणी सोम्या-गोम्यानी त्याची अवहेलना करावी... 


कित्येक प्रकारची सरकारी

कामे शिक्षक प्रामाणिकपणे करत आलेला आहे...


मुलांना सुट्टी म्हणून शिक्षकांना सुट्टी, ह्यात नवल ते काय, पण त्यावरही समाज त्याची ईर्ष्या करतो. 


इतर सगळ्या नोकऱ्या शिक्षणामुळे आहेत.


शिक्षक हा शिक्षणाचा कणा आहे. याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. 


शिक्षक आदर मागत नाही, 

पण तो त्यास पात्र आहे हेही खरे...!


विचार करा..